अजिंठा येथील जय श्रीकृष्ण मंदिरात पंच पर्व सोहळ्यासह दिक्षाविधी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अजिंठा येथील महानुभाव आश्रम जय श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त धर्मकुमार गोविंद पठाडे यांचा दिक्षाविधी कार्यक्रम मंगळवारी दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला यावेळी - मान्यवरांच्या हस्ते नूतन वास्तूचे उ‌द्घाटन, श्रीदिवाकर रुध्दपूरकर महंती प्रतिष्ठा व सूत्रमंथन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

पंचपर्व सोहळ्यासह श्रीपंचअवतार उपहाराचा सर्व भाविकांनी आस्वाद घेतला. यावेळी सेवासदन वास्तूचे उदघाटन प. पू. महंत आचार्यप्रवर खामनीकरबाबा (कनाशी) यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयाचे अनावरण प. पू. महंत नागराजबाबा - (रुद्धपूर) उपाख्य श्रीगोपीराजबाबा यांच्या हस्ते तर पाकगृहाचे उद्घाटन तपस्विनी सोजरबाई, तपस्विनी मीराबाई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे ध्वजारोहण प.पू. महंत आचार्यप्रवर दर्यापूरकरबाबा यांच्या हस्ते करण्यात आले. 

अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकरबाबा (अमरावती) हे होते. यावेळी प. पू. महंत आचार्यप्रवर वर्धनस्त बिडकरबाबा (रनाईचे), माहूरचे पिठाधीश प. पू. महंत माहूरकर बाबा (माहूर), प.पू. महंत आचार्यप्रवर साळकरबाबा, प. पू. महंत आचार्यप्रवर गुंफेकरबाबा, प. पू. महंत आचार्यप्रवर पू. महंत आचार्यप्रवर विद्वांसबाबा साहित्यचार्य बा. भो. शास्त्री, प. सातारकरबाबा, प. पू. महंत आचार्यप्रवर वर्धनस्त बीडकरबाबा, प. पू. महंत आचार्यप्रवर राहेरकर बाबा, डॉ. सतीश बडवे, पू. महंत आचार्यप्रवर कारंजेकरबाबा प. पू. प. म. परिमांडल्य कुलाचार्य लासुरकर बाबा (जळगाव), प. पू. प. म. कविश्वर आम्नाय मेहकरकर बाबा (मढ), प.पू.महंत कविश्वर आम्नाय जामोदेकर बाबा (गजियाबाद), प. पू. महंत आचार्यप्रवर न्यायम्बास बाबा (मकरंधोकडा), प. पू. महंत आचार्यप्रवर सातारकरबाबा (सातारा), प. पू. महंत आचार्यप्रवर सरळबाबा (रनाईचे), प. पू. प. म. पातूरकरबाबा (लोणखेडा), प. पू. प. म. आंबेकरबाबा (जाळीचादेव), प. पू. प. म. बाभुळगावकर बाबा (परभणी ), प. पू. प. म. शकेजकर बाबा (परभणी), डॉ. मंगला पठाडे, तपस्विनी शांताबाई कोठी हजर होते. प्रास्ताविक पू. महंत श्रीविश्वनाथबाबा कोठी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अजिंठा येथील प.पू.महंत उपाद्य आम्नाय आचार्यप्रवर यांनी मानले.